शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल अफरातफरप्रकरणी वायरमन संदीप मेथे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:26 IST

ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलात अफरातफर केल्याप्रकरणी वायरमन संदीप मेथे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. केर्ली, (ता. करवीर) येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीनंतर महावितरणचे ग्रामीण अभियंता एस. एस. रानभरे यांनी ही कारवाई केली आहे. उपअभियंता व्ही. एस. सपाटे यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार ही कारवाई झाली आहे.

ठळक मुद्देवीज बिल अफरातफरप्रकरणी वायरमन संदीप मेथे निलंबितरकमेचा भरणा बँकेत जमा झाला नसल्याचे स्पष्ट

कोल्हापूर : ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलात अफरातफर केल्याप्रकरणी वायरमन संदीप मेथे याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. केर्ली, (ता. करवीर) येथील ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रारीनंतर महावितरणचे ग्रामीण अभियंता एस. एस. रानभरे यांनी ही कारवाई केली आहे. उपअभियंता व्ही. एस. सपाटे यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार ही कारवाई झाली आहे.केर्ली, सोनतळी, रजपूतवाडी येथील ग्रामस्थांकडून महावितरणकडे नियमितपणे वीज बिलांचा भरणा होतो. नेहमीप्रमाणे वायरमन संदीप मेथे याच्याकडेच ही रक्कम दिली जाते. त्याच्या पावत्याही मिळत होत्या; पण एप्रिलपासून बिल भरूनदेखील पावत्या देण्यास वायरमन मेथे हा टाळाटाळ करत होता. यामुळे शंका आल्याने ग्रामस्थांनी महावितरणकडे याबाबत चौकशी केली असता, बिलेच जमा न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी तत्काळ महावितरणकडे तक्रार नोंदविली.या तक्रारीनुसार उपअभियंता व्ही. एस. सपाटे यांनी चौकशी केली असता, मेथे याच्याकडून रकमेचा भरणा बँकेत जमा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. तीन गावांतील दोन महिन्यांतील बिलांची रक्कम मेथे याने आपल्याकडेच ठेवली आहे. हे सिद्ध झाल्यानंतर सपाटे यांनी ग्रामीण अभियंता रानभरे यांच्याकडे अहवाल पाठवून कार्यवाही प्रस्तावित केली. त्यानुसार मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर