शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

सावर्डे खुर्द येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:51 AM

मुरगूड : सावर्डे खुर्द (ता. कागल) येथील महादेव शिवाजी घराळ (वय २५) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी महादेव याची पत्नी पूनम हिनेच जेवण आणि चहातून विष देत पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पूनम महादेव घराळ हिच्यावर कारवाई करावी, ...

मुरगूड : सावर्डे खुर्द (ता. कागल) येथील महादेव शिवाजी घराळ (वय २५) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी महादेव याची पत्नी पूनम हिनेच जेवण आणि चहातून विष देत पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पूनम महादेव घराळ हिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी मुरगूड पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.अधिक माहिती अशी, सावर्डे खुर्द येथील महादेव पाटील हा आईबरोबर राहत होता. त्याची सहा एकर बागायत जमीन असून, तो गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस होता. त्याच्या घरची परिस्थिती उत्तम होती. दरम्यान, त्याच्या आईचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे घरामध्ये तो एकटाच होता. तीन बहिणींची लग्ने झाली असून दोन महिन्यांपूर्वी १७ जुलैला त्याचेही लग्न हमीदवाडा (ता. कागल) येथील माधवी आनंदा हासबे (पूनम) हिच्याशी झाले होते.मंगळवारी (दि. ११ सप्टेंबर) महादेव कामावरून येऊन टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी त्याला पत्नी पूनमने चहा दिला. चहा पिल्यानंतर काही वेळांतच त्याला उलट्या सुरू झाल्या. उलट्या थांबत नाहीत म्हणून महादेवची चुलती हौसाबाई यांनी त्याला दवाखान्यात नेले; पण तेथून त्याला कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सोमवारी सकाळी महादेववर अंत्यसंस्कार करून सावर्डे खुर्द येथून कुटुंबीय व शेकडो ग्रामस्थ मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांनी निवेदनाद्वारे महादेवचा त्याची पत्नी पूनम हिनेच खून केला असल्याचा आरोप केला आहे. महादेव रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना पत्नी व तिच्या नातेवाईकांनी अजिबात चौकशी केली नसल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी लावला.शिवाय हे प्रकरण मिटविण्यासाठी खोटा जबाब नोंदवून घेतल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी महादेवच्या बहिणी अनिता जयसिंग पाटील, उषाताई बाळू ढोले, सुनीता विश्वनाथ पसारे यांनी केली आहे. दरम्यान, पूनम आणि महादेव यांचे लग्न सर्वांच्या मर्जीने झाले आहे. पूनमवर केलेले आरोप धक्कादायक आहेत. पूनमकडून असे कृत्य कदापि होणार नाही, असे पूनमचे मामा पंडित दंडवते (हमीदवाडा) यांनी सांगितले.