देशद्रोही स्वरूपाच्या गुन्ह्याचा संशय; चौघांची चौकशी सुरू?

By Admin | Updated: January 24, 2015 00:08 IST2015-01-23T23:59:35+5:302015-01-24T00:08:31+5:30

इचलकरंजीतील प्रकार : टेलिकम्युनिकेशन व एटीसी पथकाची कारवाई

Suspected of criminal trafficking; Four inquiries started? | देशद्रोही स्वरूपाच्या गुन्ह्याचा संशय; चौघांची चौकशी सुरू?

देशद्रोही स्वरूपाच्या गुन्ह्याचा संशय; चौघांची चौकशी सुरू?

इचलकरंजी : येथील जनता चौक परिसरात असलेल्या एका साडी दुकानाच्या वरील मजल्यावर संजय नामक व्यक्तीने इंटरनॅशनल मोबाईल कॉल कटिंग करून बेकायदेशीरपणे एका ‘डीवाईस’च्या माध्यमातून त्याचा गैरवापर करत असल्याचे समजते. ही माहिती मिळाल्याने केंद्रीय डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी विरोधी पथक (एटीसी)ला सोबत घेऊन धाड टाकली. संजयसह चारजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दिवसभर कसून चौकशी सुरू होती. हा गुन्हा देशद्रोहाच्या स्वरूपाचा असल्याचे समजते. त्यामुळे याबाबत पथकाने कमालीची गुप्तता पाळली आहे.
येथील जनता चौक परिसरातील संजय राशीचे खडे व ज्योतिषविद्या अशी कामे करतो. साडी दुकानाच्या वरील मजल्यावर बोगस सिमकार्ड वापरून कॉल कटिंग करणारे बेकायदेशीर ‘डीवाईस’ ठेवून तेथून संजय अनेक नॅशनल व इंटरनॅशनल कॉल कटिंग करून त्याचा गैरवापर करत असल्याचे समजते. यासंदर्भातील लोकेशन शोधत टेलिकम्युनिकेशन विभागाच्या पथकाने आज, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संजयच्या कार्यालयावर धाड टाकली. संजयने केलेला गुन्हा गंभीर व देशद्रोही स्वरूपाचा असल्याने पथकाने कोल्हापूर येथील दहशतवादी विरोधी पथकाला सोबत घेऊन कारवाई सुरू केली आहे. चारजणांना पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवून संपूर्ण माहितीदिली जाईल, असे एटीसीचे प्रमुख अभिजित देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Suspected of criminal trafficking; Four inquiries started?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.