वडगावात संशयित आरोपी कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:24+5:302021-04-27T04:26:24+5:30

पेठवडगाव : पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणातील अटक केलेल्या वडगावातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. ...

Suspected accused coroned in Wadgaon | वडगावात संशयित आरोपी कोरोनाबाधित

वडगावात संशयित आरोपी कोरोनाबाधित

पेठवडगाव : पोलिसांनी मोटारसायकल चोरी प्रकरणातील अटक केलेल्या वडगावातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, वडगाव शहरात सोमवारी आणखी २३ कोरोना रुग्णांची भर पडली. शहरातील रुग्णांची एकूण संख्या १३२ झाली आहे. सोमवारी शहरातील भाजी मंडई समोरील एका पिठाची गिरण असणाऱ्या सातजण, तर गणेश मंदिरानजीक एका घरातील पाचजण, नगरसेवकांच्या घरात पत्नी, आई, तर शिवाजीनगर येथे एकजण कोरोनाबाधित झाले आहेत, तर डी मार्ट येथील तिघेजण कोरोनाबाधित झाले आहेत.

रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे किणी पथकर नाक्यावरही पोलिसांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. यातच संशयित आरोपीला तीन दिवसांपूर्वी संचारबंदी काळात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. यावेळी त्याने मोटारसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यास सोमवारी न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यापूर्वी अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यास उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आणखी एका संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला.

आरोपीचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने पोलीस खात्यात एकदा खळबळ उडाली असून, वडगाव पोलीस ठाणे सुरू असले तरी त्याच्या संपर्कातील दोन होमगार्डसह पाच पोलिसांनादेखील होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Web Title: Suspected accused coroned in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.