बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:29 IST2021-09-24T04:29:31+5:302021-09-24T04:29:31+5:30
राधानगरी : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दीड वर्षापासून जबरदस्ती करून शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणातील संशयित आरोपी ...

बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला अटक
राधानगरी : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दीड वर्षापासून जबरदस्ती करून शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रवीण बंडोपंत खडके (रा. लाडवाडी, ता. राधानगरी) याला राधानगरी पोलिसांनी बुधवारी अटक केली. येथील दिवाणी न्यायालयातून त्याला रविवार (ता.२६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
एक महिन्यापूर्वी हा गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, अपघातात खडके याचा एक पाय मोडला होता. त्यामुळे त्याला अटक झालेली नव्हती. पीडित महिला तालुक्यातील भोगावती काठावरील एका गावातील असून याच परिसरात काम करत आहे. ओळख झाल्याने संशयित तिला अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. एक दिवस खडके याने आपल्या गाडीवरून जबरदस्तीने नेऊन जबरदस्तीने अश्लील फोटो काढले व ते मोबाइलवर सोडण्याची धमकी देऊन मे 2020 पासून वेळोवेळी जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याची तक्रार संबंधित महिलेने दिली होती.