कारागृह कर्मचाऱ्यावर कोयता हल्लाप्रकरणी संशयित अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:11+5:302021-06-09T04:29:11+5:30

कोल्हापूर : कारागृहातील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी सूरज अनिल पवार (वय २४ रा. ...

Suspect arrested in Koyata attack on prison staff | कारागृह कर्मचाऱ्यावर कोयता हल्लाप्रकरणी संशयित अटक

कारागृह कर्मचाऱ्यावर कोयता हल्लाप्रकरणी संशयित अटक

कोल्हापूर : कारागृहातील कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी सूरज अनिल पवार (वय २४ रा. कळंबा जेल क्वाॅटर्स, कळंबा, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कळंबा कारागृहातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने कारागृहासमोरच आहेत. सोमवारी सकाळी अनिल तुकाराम लोहार (वय ४८, रा. कळंबा जेल क्वॉटर्स, कोल्हापूर) हे आपल्या पत्नीसोबत बाजार आणण्यासाठी जात होते. त्यावेळी किरकोळ कारणांवरून सूरज पवार याने त्यांच्यावर वाद करून शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यात लोहार हे जखमी झाले. हल्लाप्रकरणी पोलिसांनी पवार याला अटक केली. सूरज पवार हा कारागृहातील लिपिकाचा मुलगा आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Suspect arrested in Koyata attack on prison staff