सुशीलकुमार शिंदे उद्या कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:49 IST2020-12-17T04:49:03+5:302020-12-17T04:49:03+5:30

कोल्हापूर : हेडपोस्ट ऑफिस बावडा ते पितळी गणपती मंदिर ताराबाई पार्क या रस्त्यास सुप्रसिद्ध शल्यविशारद धन्वंतरी डॉ. वि. ह. ...

Sushilkumar Shinde in Kolhapur tomorrow | सुशीलकुमार शिंदे उद्या कोल्हापुरात

सुशीलकुमार शिंदे उद्या कोल्हापुरात

कोल्हापूर : हेडपोस्ट ऑफिस बावडा ते पितळी गणपती मंदिर ताराबाई पार्क या रस्त्यास सुप्रसिद्ध शल्यविशारद धन्वंतरी डॉ. वि. ह. वझे यांचे नाव देण्याचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.१८) माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी साडेचार वाजता पितळी गणपती चौकात होत आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह माजी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक माजी उपमहापौर अर्जुन माने आणि डॉ. गिरीष वझे यांनी केले आहे.

Web Title: Sushilkumar Shinde in Kolhapur tomorrow