शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Surya Grahan 2022: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी, ग्रहण काळात नदीत केले जपजाप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2022 19:00 IST

ग्रहण पर्वकालात जपजाप्य अनुष्ठान व धार्मिक पुस्तकांचे वाचन केल्याने पुण्य प्राप्ती होते अशी अनेकांची श्रद्धा असल्याने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर भाविकांनी गर्दी केली.

प्रशांत कोडणीकरनृसिंहवाडी : खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त भाविक व यात्रेकरूंनी  श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसरात कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर मोठ्या संख्येने स्नान व  दर्शनासाठी हजेरी लावली. ग्रहण काळात पुरुष व महिलांनी नदीच्या पाण्यात राहून जपजाप्य केले. हवामान स्वच्छ असल्याने शाळेतील मुले व तरुणांनी गॉगल व एक्सरे फिल्मच्या साह्याने सूर्यग्रहण पाहिले.सूर्यग्रहणानिमित्त आज, सकाळी ४.३० वाजता मंदिरात काकड आरती व षोडशोपचार पूजा संपन्न झाली. दुपारी ४.५७ वाजता ग्रहण स्पर्श व सायंकाळी ६.३० वाजता ग्रहण मोक्षचे श्रीना स्नान घालणेत आले. त्यानंतर श्रीचे चरणकमलावर महापूजा करणेत आली व महापूजे नंतर धूप, दिप, आरती होऊन पालखी सोहळा संपन्न झाला. रात्रो ९.३० नंतर शेजारती करण्यात येणार आहे.दरम्यान ग्रहण पर्वकाल स्नान करणेसाठी परिसर तसेच सांगली, कोल्हापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्यातून तसेच कर्नाटक व गोवा राज्यातूनही अनेक भाविक दाखल झाले होते. ग्रहण पर्वकालात जपजाप्य अनुष्ठान व धार्मिक पुस्तकांचे वाचन केल्याने पुण्य प्राप्ती होते अशी अनेकांची श्रद्धा असल्याने कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर भाविकांनी गर्दी केली. ग्रहण पर्वकाल संपलेनंतर असंख्य भाविकांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ च्या गजरात नदीत स्नान करून श्री चरणाचे दर्शन घेतले.दत्त देव संस्थानमार्फत दर्शनरांग, मुखदर्शन, तसेच नदी किनारी सुरक्षा रक्षक, कापडी मंडप, सीसीटीव्ही कॅमेरा आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी व सचिव संजय नारायण पुजारी यांनी सांगितले. नावाडी संजय गावडे व अरुण गावडे यांनी नदीकाठी सुरक्षितेसाठी आपली नाव तैनात ठेवली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsolar eclipseसूर्यग्रहणDatta Mandirदत्त मंदिर