‘पुरातत्त्व’कडून पाहणी

By Admin | Updated: August 26, 2015 00:40 IST2015-08-26T00:40:16+5:302015-08-26T00:40:16+5:30

रखडलेल्या पुलाची लवकरच परवानगी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आर. के. बामणे यांनी परवानगीसाठी पाठपुरावा करीत आहोत, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Survey by 'Archaeologist' | ‘पुरातत्त्व’कडून पाहणी

‘पुरातत्त्व’कडून पाहणी

कोल्हापूर : शहरालगत असलेल्या शिवाजी पुलाशेजारी नव्याने बांधण्यात येत असलेल्या पर्यायी पुलाच्या रखडलेल्या कामांची पाहणी केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी रेनडे-पाटील यांनी मंगळवारी केली. कामासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व विभागाची परवानगी लवकर मिळावी, यासाठी अहवाल दिला जाईल, असे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर १३४.८० मीटर लांबीच्या पर्यायी पुलासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मार्च २०१३ रोजी पुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र वाळूटंचाई, पाटबंधारे, पुरातत्त्व, नगररचना, महानगरपालिका यांच्या परवानग्यांसाठी काम विविध टप्प्यांत रेंगाळले. उर्वरित पुलाचे काम करण्यासाठी ब्रह्मपुरी परिसरातील झाडे तोडण्याची परवानगी राष्ट्रीय महामार्ग प्र्राधिकरणाने महानगरपालिकेकडे मागितली. महानगरपालिका प्रशासनाने पुरातत्त्व विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामांची पाहणी केली.
पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर सहा महिने ठप्प असलेल्या कामाला सुरुवात होणार आहे. मार्च २०१६ अखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत शहराशेजारीच असलेल्या या पुलाचे ७० टक्के काम झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सर्व परवानग्यांची आवश्यकता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आर. के. बामणे यांनी परवानगीसाठी पाठपुरावा करीत आहोत, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Survey by 'Archaeologist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.