सीपीआरमध्ये म्युकरच्या ५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:53+5:302021-06-17T04:17:53+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या तीन रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून आणखी दोन रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला ...

Surgery on 58 mucosal patients in CPR | सीपीआरमध्ये म्युकरच्या ५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया

सीपीआरमध्ये म्युकरच्या ५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या तीन रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून आणखी दोन रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. सध्या १२७ जणांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात १८३ जणांना म्युकरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील ३० जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सीपीआरमध्ये ११७ तर खासगी रुग्णालयात ५७ जणांवर उपचार सुरू आहेत.

या आजारामध्ये शस्त्रक्रिया महत्त्वाची असून सीपीआरमध्ये अशा ५८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रोज तीन-चार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत असून या सर्व शस्त्रक्रिया मोफत हाेत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा सीपीआरकडे ओढा वाढला आहे.

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर, डॉ. स्नेहल सोनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप वाडकर, भूलतज्ज्ञ विभागप्रमुख डॉ. उल्हास मिसाळ यांच्या पथकाने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत. सीपीआरमध्ये म्युकरसाठी खाटा वाढवण्याचे काम सुरू असून यासाठी आवश्यक उपकरणे, औषधांसाठीही जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मंजूर केला आहे.

Web Title: Surgery on 58 mucosal patients in CPR