शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

ओबीसीचा निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी?, तारीख सांगत मंत्री पाटीलांनी स्पष्टच केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 17:49 IST

इचलकरंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपेत जरी शब्द दिला असला तरी ते पाळतात. त्यामुळे मैदान बघून ठेवा, सुरेश ...

इचलकरंजी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपेत जरी शब्द दिला असला तरी ते पाळतात. त्यामुळे मैदान बघून ठेवा, सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेणार आणि त्यांच्या सत्काराला मी येणार, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच ओबीसीचा निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबतही मंत्री पाटील यांनी स्पष्टच सांगितले.येथील लायन्स क्लबमध्ये भाजपच्यावतीने मंत्री पाटील यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आमदार, बूथप्रमुख यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हाळवणकर होते. यावेळी कोअर समितीची घोषणा करण्यात आली.आगामी काळात निवडणुका तसेच विविध निर्णय घेण्यासाठी तेराजणांची कोअर समितीची घोषणा मंत्री पाटील यांनी केली.मंत्री पाटील म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वजण एकत्र आल्याने महापौर भाजपचा होण्यास काही अडचण नाही. मात्र, काही प्रश्न निर्माण झाले, तर ते सर्वांना एकत्र घेऊन सोडवणे आवश्यक आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जावे. काही वेळेला एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होणार. अन्याय झालेल्यांनी तो सहन करावा. आवाडे आपल्यासोबत कार्यकर्ते घेऊन आले आहेत. त्यांच्यातील कार्यकर्त्यांनाही न्याय द्यावा लागेल. आपले घर मोठे करण्यासाठी मंत्री व्हायचे नसते, तर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री होणे अपेक्षित आहे.हाळवणकर म्हणाले, काही लोक आमच्यात येऊन दुकान चालविण्याच्या नादात आहेत. मात्र, त्यांचे दुकान चालणार नाही. जे काम करतील, त्यांना उमेदवारी मिळेल. गाडी व बंगला बघून उमेदवारी मिळणार नाही. भले पराभवाला सामोरे जावे लागले तरी चालेल. आमदार राहुल आवाडे म्हणाले, आपण सुरुवातीपासूनच भाजपसोबत असून, आगामी काळात हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणू. उद्या कोल्हापूर जिल्ह्यातून विधान परिषदेवर जाणारा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल, असे वचन आपण देत असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.यावेळी मंत्री पाटील, राहुल आवाडे, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला. अमृत भोसले यांनी स्वागत व शहाजी भोसले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अशोकराव स्वामी, अरुण इंगवले, प्रकाश दत्तवाडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, मिश्रीलाल जाजू, आदी उपस्थित होते.

१ फेब्रुवारीच्या अगोदर ओबीसीचा निकालस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अनुसरून सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसीचा खटला सुरू आहे. त्याचा निकाल जानेवारी महिन्यात लागेल, असा आमचा व्होरा आहे. जे-जे हवे आहे, ते सरकारने न्यायालयात सादर केले आहे. २२ जानेवारीला याची सुनावणी आहे. २२ जानेवारी अथवा १ फेब्रुवारीच्या अगोदर याचा निकाल लागला, तर ३१ मेच्या आत या निवडणुका होण्यास काही अडचण वाटत नाही. असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

आमदारांनी फिरवली पाठभाजपच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या सत्काराचे आयोजन केले होते. त्यामध्ये सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे, अशोकराव माने यांचा समावेश होता. आवाडे व माने वगळता एकही आमदार या कार्यक्रमाला आला नाही. आमदारांनी पाठ फिरविल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.

दोघांनी आदर्श ठेवला

जेलमध्ये गेले, निवडून आले, पडले, राज्यात सरकार येणार असताना तिकीट नाकारले, त्याबद्दल त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणता फरक पडत नाही. तसेच कुठल्याही परिस्थितीत आपल्या व्यवहारामध्ये कमी-जास्तपणा झालेला नाही, असे हाळवणकर व ज्यांना मंत्रिपद मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अशावेळी उमेदवारी सोडून आपल्या मुलाला उमेदवारी दिली, ते प्रकाश आवाडे. या दोघांचा आदर्श घेण्यासारखे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर