कुपवाडमध्ये सूरज बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ
By Admin | Updated: December 26, 2014 00:10 IST2014-12-25T23:07:35+5:302014-12-26T00:10:52+5:30
राज्यांमधील १७६ बुद्धिबळपटू सहभागी

कुपवाडमध्ये सूरज बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ
कुपवाड : नूतन बुद्धिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अकॅडमी यांच्या विद्यमाने आयोजित सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस आज, गुरुवारी येथील नवकृष्णा व्हॅली क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश या राज्यांमधील १७६ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत़
स्पर्धेचे उद्घाटन उद्योगपती भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी चिंतामणी लिमये, टी़ एऩ कृष्णमूर्ती, डॉ़ उल्हास माळी, प्रा़ रमेश चराटे, चिदम्बर कोटीभास्कर, विनायक जोशी प्रमुख उपस्थित होते़
पहिल्या फेरीत समीर कठमाळे, अरविंद शास्त्री, अनिश गांधी, संतोष कश्यप, सिद्धांत गायकवाड, रवींद्र निकम, शुभम कुमठेकर यांच्यासह ७५ खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत आघाडी घेतली़ सांगलीच्या पौर्णिमा उपळावीकर व गायत्री रजपूत यांनी बरोबरी साधली़