कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. १८) फेटाळली. कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या घटनात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या पीठाने नोंदवले. या निर्णयामुळे सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, वकिलांसह पक्षकारांनी याचे स्वागत केले.कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सर न्यायाशीध भूषण गवई यांनी घेतला होता. त्यांच्या हस्ते १८ ऑगस्टला सर्किट बेंचचे उद्घाटन झाले आणि कामकाजही सुरू झाले. मात्र, याविरोधात ॲड. रणजीत बाबूराव निंबाळकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सर्किट बेंचच्या स्थापनेला विरोध दर्शवला होता.यावर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या पीठासमोर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. दोन्ही न्यायमूर्तींनी ॲड. निंबाळकर यांची याचिका फेटाळून लावत सर्किट बेंचचा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे स्पष्ट केले.राज्य पुनर्रचना कायदा १९५६ च्या कलम ५१ (३) नुसार सरन्यायाधीशांना मिळालेल्या अधिकारातून हा निर्णय घेतला आहे. यातून कोणाच्याही अधिकारांचे उल्लंघन होत नाही. उलट मुंबई उच्च न्यायालयापासून दूर अंतरावर असलेल्या पक्षकारांना न्याय मिळणे सुलभ झाल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. राज्य सरकारच्या वतीने भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ॲड. संदीप देशमुख यांनी बाजू मांडली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला निश्चितच बळ मिळेल. लवकरच याचे दृष्य परिणाम दिसतील. सहा जिल्ह्यातील सर्व वकील आणि पक्षकारांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. - ॲड. व्ही. आर. पाटील - अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन
Web Summary : The Supreme Court dismissed a petition against the Kolhapur Circuit Bench, affirming its constitutional validity. This decision facilitates its conversion into a permanent bench, benefiting litigants in six districts by providing easier access to justice. The bench was initiated to help those far from Mumbai High Court.
Web Summary : सुप्रीम कोर्ट ने कोल्हापुर सर्किट बेंच के खिलाफ याचिका खारिज की, संवैधानिक वैधता की पुष्टि की। यह निर्णय इसे स्थायी पीठ में बदलने की सुविधा प्रदान करता है, जिससे छह जिलों के मुकदमेबाजों को न्याय तक आसान पहुंच प्राप्त होती है। यह बेंच मुंबई उच्च न्यायालय से दूर रहने वालों की मदद के लिए शुरू की गई थी।