शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

GokulMilk Kolhapur : महाडिकांचा शब्द घेऊन राजू शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 14:41 IST

GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

ठळक मुद्देमहाडिकांचा शब्द घेऊन शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबागोकुळचे रणांगण ,कोल्हापुरात घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला.शेट्टी सध्या राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीसोबत आहेत, मात्र, गोकुळसाठी विरोधी आघाडीमध्ये महाविकास आघाडीचे सदस्य असताना त्यांनी ही भूमिका घेतल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. शेट्टी तसेच अशोक चराटी यांनी सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याची घोषणा आज, कोल्हापूरात पत्रकार बैठकीत आघाडीच्या नेत्यांनी केली.ह्यगोकुळह्ण दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली होती. सत्तारूढ आघाडीला पाठिंबा देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर शेट्टी यांनी पाठिंब्याबाबत अनुकूलता दर्शविली. याबाबतची अधिकृत घोषणा आज, बुधवारी त्यांनी कोल्हापुरात केली आहे.गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली विरोधी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे राजू शेट्टी हेही त्यांच्यासोबत राहतील, असे वाटत होते. मात्र, पॅनल बांधणीसह इतर घडामोडींमध्ये त्यांचा फारसा संपर्क राहिला नाही, उलट शेट्टी यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी शेट्टी यांची ह्यगोकुळह्ण निवडणुकीतील भूमिकेची दिशा स्पष्ट झाली होती.या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी शेट्टी यांची शिरोळ येथे भेट घेतली. भेटीदरम्यान मल्टीस्टेटचा रद्द केलेला ठराव, कोरोना काळात दूध उत्पादकांना झालेली मदत आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सत्तारूढ गटाला पाठिंब्याबाबत शेट्टी यांनी अनुकूलता दर्शविली.आज, कोल्हापुरात आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. बैठकीला सावकार मादनाईक, प्रा. जालिंदर पाटील, सागर शंभूशेटे, बंडू पाटील, डॉ. महावीर अकोळे, स्वस्तिक पाटील, आदिनाथ हेमगिरे, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, नगरसेवक शीतल गतारे, बजरंग खामकर आदी उपस्थित होते.

सत्ताधारी आघाडीला पाठिंबा द्या, अशी विनंती धनंजय महाडिक यांनी आपल्याला भेटून केली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला आहे.- राजू शेट्टी,नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीGokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक