शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
2
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
3
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
4
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
5
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
6
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
7
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
8
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
9
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
10
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
11
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
12
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
13
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
14
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
15
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
16
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
17
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
18
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
19
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
20
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट

‘आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’; कोल्हापुरात सतेज पाटील समर्थकांची बॅनरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:31 IST

कोल्हापूर : ‘निष्ठेशी तडजोड नाही, आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’, असे बॅनर कसबा बावड्यासह साऱ्या शहरभर लावत काँग्रेसचे ...

कोल्हापूर : ‘निष्ठेशी तडजोड नाही, आमचं निस्तारायला आमचा साहेब घट्ट हाय’, असे बॅनर कसबा बावड्यासह साऱ्या शहरभर लावत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी पराभवातून खचून जाणार नसल्याचा संदेश दिला आहे. बावड्यातील रेणुका मंदिरापासून ते श्रीराम पेट्रोलपंपापर्यंत ठिकठिकाणी वेगवेगळ्या आशय असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. असेच फलक दाभोळकर कॉर्नरपासून अगदी संभाजीनगर कळंब्यापर्यंत लागले आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यात कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचाही पराभव झाला. महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर व अमल महाडिक यांच्या अभिनंदनाचे बॅनर ठिकठिकाणी लागले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून सतेज पाटील यांच्या समर्थकांनी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांचे बॅनर लावत पराभवाने हिम्मत हरली नसल्याचा संदेश दिला आहे. 'गुलालाचाच विषय हाय न्हवं, थोडे दिवस थांबा लवकरच घरपोच होईल' हरलो तरी मैदान सोडलेले नाही..वेळ कोणती पण असुदेत, काल पण, आज पण, उद्या पण सदैव तुमच्यासोबतच..पडत्या काळात साथ सोडणारी आमची औलाद नाही..कायम एकनिष्ठ..असे आव्हानात्मक मजकूर असलेल्या बॅनरमधून त्यांनी महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये या पराभावाची परतफेड करणार असल्याचा इशारा दिला आहे. खेळ अजून संपलेला नाही, खरा खेळ तर आता सुरू झाला आहे. तू चाल पुढे तुला रं गड्या भीती कशाची, यासह विविध आशय असलेले बॅनर सगळीकडे झळकले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024