शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी

By admin | Updated: May 26, 2015 01:07 IST

हसन मुश्रीफ यांची ग्वाही : कागलमध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ

कागल : विक्रमसिंहराजेंच्या निधनामुळे आपल्या सर्वांचे पितृछत्र हरपले आहे. ही पोकळी भरून निघणारी नाही. राजे आयुष्यभर खऱ्या अर्थाने राजासारखेच जगले. कधीही, कोणतीही तडजोड केली नाही. राजेंनी उभे केलेले काम पुढे नेण्याची जबाबदारी समरजितसिंह यांच्यावर आहे. तुमच्या कोणत्याही संस्थेत मला अथवा आमच्या कार्यकर्त्यांना रस नाही. आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू, असे उद्गार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी काढले.कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील ६५०० चाव्यांना मोफत पाणीमीटर जोडणे, ऐतिहासिक विठ्ठल मंदिरासमोर दीपस्तंभ व परिसर सुशोभीकरण करणे, अपंगांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमांत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. नगराध्यक्षा आशाकाकी माने, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, बाळ पाटील, प्रकाश गाडेकर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.आमदार मुश्रीफ म्हणाले, शहरातील सर्व चावीधारकांना मोफत मीटर देणारी कागल नगरपरिषद राज्यात नव्हे, तर देशात एकमेव आहे. चाव्यांना मीटर बसविणे हे शासनाचेच धोरण आहे. घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचाही प्रारंभ लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार आहोत. अपंगांना न मागता दरवर्षी असे साहित्य नगरपालिकेने द्यावे.समरजितसिंह घाटगे म्हणाले, आपल्या भागात मुबलक पाणी उपलब्ध आहे. तरीही नगरपालिकेने चांगला निर्णय घेतला आहे. मोफत मीटर देत आहात, तर त्याच्या सुरक्षेच्याही उपाययोजना करा. या योजनेमुळे पाणी, वीज बचत होऊन नगरपालिकेला तसेच लोकांनाही फायदा होणार आहे. एका विशिष्ट वळणावर माझ्यावर चेअरमनपदाची जबाबदारी आली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ती पेलणार आहे. नगराध्यक्षा आशाकाकी माने यांनी स्वागत केले. रमेश माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भैया माने, मनोहर पाटील यांचीही भाषणे झाली.दीपावलीपूर्वी राममंदिर : घाटगेसमरजितसिंह घाटगे म्हणाले, अक्षरधामच्या धर्तीवर कागल शहरात उभे राहत असलेले राममंदिर हे विक्रमसिंहराजेंचे स्वप्न होते. त्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे, तर त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या दीपावलीपूर्वी या राममंदिराचे उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्वांनी सहकार्य करावे.