शाश्वत प्रतिष्ठानचा जयप्रभा-शालिनी सिनेटोन कृती समितीला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:54+5:302021-07-20T04:17:54+5:30

कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जयप्रभा व शालिनी सिनेटोन कृती समितीला पाठिंबा देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय चित्रपट ...

Support to the Jayaprabha-Shalini Cinetone Action Committee of the Eternal Foundation | शाश्वत प्रतिष्ठानचा जयप्रभा-शालिनी सिनेटोन कृती समितीला पाठिंबा

शाश्वत प्रतिष्ठानचा जयप्रभा-शालिनी सिनेटोन कृती समितीला पाठिंबा

कोल्हापूर : येथील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीने जयप्रभा व शालिनी सिनेटोन कृती समितीला पाठिंबा देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत अध्यक्ष डाॅ. गुरुदत्त म्हाडगुत म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या राजाश्रयामुळे कोल्हापूरच नव्हे तर भारतभरात अनेक दिग्गज व कसदार कलाकार व कलाक्षेत्राशी निगडित तज्ज्ञ घडले आणि घडत आहेत. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून जयप्रभा व शालिनी सिनेटोनकडे पाहावे लागेल. उपाध्यक्ष राहुल चौधरी म्हणाले, कृती समितीच्या या लढाईत आम्ही कायदेशीर मार्गाने पाठीशी राहू. चित्रपट निर्माते संदीप जाधव यांनी समन्वयकाची भूमिका विषद केली. निवेदन स्वीकारताना चित्रपट निर्माते सुरेंद्र पन्हाळकर, कृती समिती अध्यक्ष अर्जुन नलावडे, महामंडळाचे संचालक शरद चव्हाण, व्यवस्थापक बोरगावे तसेच पृथ्वीराज जगताप, निलेश कांबळे, निखिल जाधव, अजय पाटील, युवराज लोखंडे, सचिन जाधव उपस्थित होते.

Web Title: Support to the Jayaprabha-Shalini Cinetone Action Committee of the Eternal Foundation