विकासासाठी भाजपला साथ द्या

By Admin | Updated: February 13, 2017 00:38 IST2017-02-13T00:38:40+5:302017-02-13T00:38:40+5:30

चंद्रकांतदादा पाटील : अब्दुललाट येथे प्रचारसभा

Support BJP for development | विकासासाठी भाजपला साथ द्या

विकासासाठी भाजपला साथ द्या



अब्दुललाट : देशातील सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी भाजप सरकारने विविध योजना आणून त्या यशस्वीही केल्या आहेत. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी भाजपाला जनतेने सहकार्य करावे. विकासाचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता हवी आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप पक्षाचे उमेदवार विजय भोजे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शंकर पाटील होते.
भोजे हे सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी झटणारे व्यक्ती आहे. जयसिंगपूर पालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भोजे यांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन प्रकाश झेले, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष नीता माने, नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम, एम. आर. पाटील, सुरेश पाटील
यांनी केले. वृषभ कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बजरंग खामकर, राजू दार्इंगडे, चंद्रकांत जाधव,
रजनीताई मगदूम, सरपंच शानाबाई कोळी, अब्बास नदाफ, लाटवाडीच्या सरपंच सुशिला खोत, उपसरपंच मल्लू खोत, आदी उपस्थित होते. संजय परीट यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Support BJP for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.