शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

राज्यातील सत्ता नव्या अध्यक्षासाठी पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:12 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.

कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या इच्छुकांचे सर्व लक्ष सध्या मुंबईच्या घडामोडींकडे आहे. तेथे येणारी सत्ता ही या अध्यक्षपदासाठी पाठबळ देण्यासाठी पूरक ठरणार असल्याने, सर्वपक्षीय इच्छुक सध्या दूरचित्रवाहिनी, मोबाईल तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमांतून तेथील माहिती घेण्यात गुंतले आहेत.जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची वाढीव मुदत २१ जानेवारीला संपणार आहे. नवा अध्यक्ष ‘इतर मागासवर्गीय’ राहणार असल्याचे आरक्षणातून स्पष्टही झाले आहे; त्यामुळे ‘इतर मागासवर्गीय’ दाखला असलेले अनेक इच्छुक सत्ता कुणाची येणार याची औत्सुक्यपूर्ण चौकशी करताना दिसत आहेत.सध्या शौमिका महाडिक या अध्यक्षा असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर काही पावले माघारी आलेला भाजप विधानसभेनंतर तर हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील दोन्ही आमदार पराभूत झाल्याने आणि अशात राज्यात सरकार बनत नाही, असेच शनिवार (दि. २३)पर्यंतचे चित्र असल्याने भाजपला ही निवडणूक जड जाणार असल्याचे चित्र होते.तुलनेत विधानसभेला कॉँगे्रस, राष्ट्रवादी यांनी दहापैकी सहा जागा जिंकल्याने आघाडी जोमात आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि त्यांना उघड पाठबळ देणारे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यामुळे जिल्हा परिषदेत दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना मिळून बाजी मारतील, असे चित्र निर्माण झाले होते.परंतु शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर हे सरकार टिकले, तर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजपचा अध्यक्ष करणे सोपे जाईल, अशी भाजप नेत्यांची अटकळ आहे. सध्या भाजपकडून अरुण इंगवले हे या पदाचे प्रमुख दावेदार आहेत.त्यांचे अनेक मित्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही आहेत; परंतु जर राज्यात दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना असे सरकार बनले तर ते इंगवले यांच्यासाठी जड जाणार आहे. परंतु भाजप अजित पवार यांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाल्यास इंगवले यांच्यासाठी ते सकारात्मक असेल.