सुपरव्होट पानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:31+5:302021-01-08T05:19:31+5:30
जयसिंगपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे गावात कोणाचे पॅनेल विजयी होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू असून, चर्चांना उधाण ...

सुपरव्होट पानासाठी
जयसिंगपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने लढतींचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे गावात कोणाचे पॅनेल विजयी होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू असून, चर्चांना उधाण आले आहे. अनेक गावांत प्रस्थापितांविरुध्द तरुणांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे प्रस्थापित गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
------------
वैयक्तिक भेटीव्दारे प्रचार
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणूक प्रचारावेळी कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना निवडणूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे पदयात्रेपेक्षा वैयक्तिक भेटीगाठी हा एकमेव पर्याय उमेदवारांपुढे असून, माघारीनंतर जोरदार प्रचारयंत्रणा राबविली जात आहे. सतरा सदस्य असलेल्या मोठ्या गावातील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
-----------------
हॉटेल व्यावसायिकांची पर्वणी
शिरोळ : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे प्रचाराबरोबर जेवणावळीही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हॉटेल, ढाब्यावर गर्दी वाढू लागली आहे. कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी पार्टीचे नियोजन केले जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकीमुळे लॉकडाऊननंतर हॉटेल, व्यावसायिकांना पर्वणी ठरत आहे.