सुपरवोट पानासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:15+5:302020-12-31T04:23:15+5:30
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय नेतेमंडळींनी कंबर कसली असून ग्रामपंचायतीवरील सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. यंदा ...

सुपरवोट पानासाठी
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय नेतेमंडळींनी कंबर कसली असून ग्रामपंचायतीवरील सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. यंदा थेट सरपंच पदाची संधी तर हुकली आहेच, त्यातच मतदानानंतर सरपंच आरक्षण काढण्यात येणार आहे. यामुळे नाराजीचा सूर असला तरी, बहुमतासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
-----------
गटा-तटाची व्यूहरचना यशस्वी
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर गटा-तटालाच महत्त्व असल्याने कोणत्याही ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी, असे चित्र सध्या तरी दिसत नाही. स्वाभिमानीने सुरुवातीलाच उदगाव, नांदणी, दानोळीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या गावात अन्य पक्ष एकत्र येत आहेत. सोयीप्रमाणे ज्या-त्या गावात आघाड्या झाल्यामुळे तूर्त तरी महाविकास आघाडीचा निवडणुकीत दिसून आला नाही. सरपंच निवडीनंतर हा पॅटर्न पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.