शाहूवाडी पोलीस ठाण्यास पोलीस अधीक्षकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:37+5:302021-01-22T04:22:37+5:30
मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची पाहणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी करण्यात ...

शाहूवाडी पोलीस ठाण्यास पोलीस अधीक्षकाची भेट
मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची पाहणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी करण्यात आली. लवकरच नवीन इमारतीमध्ये पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरू होणार आहे.
शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. रंगकाम, फर्निचरचे काम याची पाहणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केली. यामध्ये लहान मुलांचा कक्ष, महिला कक्ष, तक्रारदार महिलांना बसण्यासाठी वेगळा कक्ष, तपासी अमलदार कक्ष याबाबत सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय वनमारे यांना बांधकामाबाबत सूचना दिल्या. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला लॅपटॉप देणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी श्रीकांत दाभोळकर, बाबा किटे, शाखा अभियंता विजय वनमारे आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.