पोलीस अधीक्षकांकडून आंदोलनस्थळी बंदोबस्ताची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:56+5:302021-06-16T04:33:56+5:30

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, बुधवारी कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ येथे खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन ...

Superintendent of Police inspects security at the protest site | पोलीस अधीक्षकांकडून आंदोलनस्थळी बंदोबस्ताची पाहणी

पोलीस अधीक्षकांकडून आंदोलनस्थळी बंदोबस्ताची पाहणी

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज, बुधवारी कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ येथे खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन होत आहे. आंदोलनात संपूर्ण राज्यातून मराठा समाजातील समन्वयक येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वरिष्ठ अधिका-यांसमवेत समाधीस्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी खासदार संभाजीराजे यांच्यासह आंदोलनस्थळाची पाहणी करून चर्चा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी नियमांचे पालन करावे, मास्कचा प्रत्येकाने वापर करावा असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.

बंदोबस्त नियोजनाबाबत माहिती देताना अधीक्षक बलकवडे म्हणाले, खासदार संभाजीराजे यांनी मोर्चा न काढता केवळ मूक आंदोलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजातील नागरिकांनी आंदोलनस्थळी गर्दी करू नये. केवळ निमंत्रितांनी आंदोलनासाठी यावे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी मास्कचा वापरासह सर्वच नियमांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दलाने आंदोलनस्थळासह संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून रात्रीपासूनच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती.

पोलीस बंदोबस्त...

- अप्पर पोलीस अधीक्षक : ०१

-उपविभागीय पोलीस अधिकारी : ०२

- पोलीस निरीक्षक : ०८

- सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक : ३४

- पोलीस अंमलदार : ४८७

- होमगार्ड : २५५

- स्ट्रायकिंग फोर्स : १४

- आरसीपी : ०३

फोटो नं. १५०६२०२१-कोल-पोलीस०१

ओळ : मराठा मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळी मंगळवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी खासदार संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)

===Photopath===

150621\15kol_8_15062021_5.jpg

===Caption===

ओळ : मराठा मुक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळी मंगळवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी खासदार संभाजीराजे यांच्याशी चर्चा केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. (छाया: आदित्य वेल्हाळ)

Web Title: Superintendent of Police inspects security at the protest site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.