शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी, येरवडा येथे बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 11:34 IST

Jail Crimenews Kolhapur- कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत आज, शुक्रवारी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची येरवडा कारागृहात बदली करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देकळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची उचलबांगडी, येरवडा येथे बदलीइंदुरकर यांची प्रभारी अधीक्षक म्हणून येरवडा कारागृहाचा पदभार

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने दखल घेत आज, शुक्रवारी कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची येरवडा कारागृहात बदली करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.कळंबा कारागृहात सापडलेल्या गांजा, मोबाईल आदी वस्तूंबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू झाली असून अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. काल सकाळी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन याप्रकरणाची चौकशी केली होती.सोमवारी मध्यरात्री चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी तीन गठ्ठे कारागृहातील संरक्षण भिंतीवरून आत फेकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले. हे गठ्ठे मंगळवारी पहाटे कारागृहातील सुरक्षा रक्षकास मिळाले. गठ्ठ्यामध्ये पाऊण किलो गांजा, नवे दहा मोबाईल संच, पेनड्राईव्ह, मोबाईल कॉड आदी साहित्य सापडले होते. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदल्याने खळबळ उडाली होती. याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेत चौकशी सुरू झाली आहे.चौकशीसाठी आलेल्या अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात कळंबा कारागृहाला भेट देऊन चौकशी सुरु केली आहे. त्यांनी सर्वप्रथम कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तातडीने उचलबांगडी करत त्यांना येरवडा कारागृहाचा पदभार दिला आहे. त्यांच्या जागी येरवडा येथील इंदुरकर यांची प्रभारी अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.अधीक्षक शेळके हे आठवडाभर घरगुती कामानिमीत्त रजेवर होते. गांजा, मोबाईल कारागृहात सापडल्यानंतर शेळके यांना अप्पर पोलीस महासंचालक रामानंद यांनी बोलवून घेतल्याने ते रजेवरुन थेट पुण्याकडे रवाना झाले. रामानंद यांनी शेळके यांच्याकडे घडल्या प्रकाराबाबत चौकशी केली होती. 

२०१९ मध्ये निलंबनाची कारवाई

यापूर्वीही शेळके यांना वाई येथील सीरियल किलर डॉ. संतोष पोळ याने कळंबा कारागृहात पिस्तूल घेऊन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणात निलंबित करण्यात आले होते.परंतु १२ मे २०१९ मध्ये शेळके यांच्यासह पंधरा जणांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली होती. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही मागे घेण्यात आली होती. या प्रकरणात शेळके यांची विसापूर कारागृहात बदली करण्यात आली होती. 

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर