‘स्वाभिमानी’ची चळवळ संपविण्यासाठी सुपाऱ्या
By Admin | Updated: October 19, 2015 00:43 IST2015-10-19T00:42:54+5:302015-10-19T00:43:27+5:30
रविकांत तूपकर : काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते संघटना फोडत असल्याचाही आरोप

‘स्वाभिमानी’ची चळवळ संपविण्यासाठी सुपाऱ्या
पेठवडगाव : राष्ट्रवादी, काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेतकरी संघटनेची माणसे फोडून चळवळ संपविण्याच्या सुपाऱ्या दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे स्वयंघोषित नेते उसासाठी आंदोलन करतात की राजू शेट्टींवर टीका करण्यासाठी, ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याची ज्यांची लायकी नाही ते शेट्टींवर टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या मोर्चाला माणसेच मिळत नाहीत, असा टोला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी हाणला.
हे नेते प्रिटींग प्रेसचे पुढारी असल्याचतूपकर म्हणाले, उसाचे गाळप झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी, असा कायदा आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत साखर कारखानदार वार्षिक सभेत बेकायदेशीर ठराव करून एफआरपी रकमेचे तुकडे पाडत आहेत. याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे स्वाभिमानीची क्रेझ अद्याप शेतकऱ्यांमध्ये असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे टीकाकारांना उत्तर मिळाले आहे. विधानसभेत स्वाभिमानी संघटनेचे आमदार नसल्यामुळे सरकारच्या कलानुसार काम करणे भाग पडते. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री आमच्यासोबतच आहेत. एफआरपीनुसार दर न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू,
पॅकेजची रक्कम हडप..
सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, हुतात्मा साखर कारखान्यांनी बेकायदेशीररित्या टनामागे अनुक्रमे १४७ व १०० रुपये कापले. को-जनरेशनच्या नावाखाली ‘राजाराम’ने २६ कोटी, तर ‘हुतात्मा’ने पावणेसात कोटी शासनाच्या पॅकेजमधील रक्कम हडप केली आहे, असा घणाघात तूपकर यांनी केला.