सनी पोवार मृत्यूची कसून चौकशी
By Admin | Updated: August 26, 2014 00:30 IST2014-08-26T00:30:34+5:302014-08-26T00:30:34+5:30
कमालीची गोपनियता : सी. आय. डी. चे पथक वडगावात तळ ठोकून

सनी पोवार मृत्यूची कसून चौकशी
कोल्हापूर : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यू प्रकरणाची सीआयडीने कसून चौकशी सुरू केली आहे. कमालीच्या गोपनीय पद्धतीने हा तपास सुरू आहे.
सनी पोवार मृत्यूप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, हवालदार बनन शिंदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावर आज, सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास खुनाचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करण्यात आला. मृत सनीचा भाऊ जयदीप पोवार याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा गोपनीय तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सी.आय.डी) विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. शा. पाटील करीत आहेत. दरम्यान, मृताच्या नातेवाइकांची आज समजकल्याण आयुक्त गायकवाड व नागरी हक्क समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन ही माहिती घेतली.
बसवर दगडफेक केल्याच्या कारणावरून वडगाव / पान १० वर