सनी पोवार मृत्यू प्रकरण : मनोजकुमार शर्मा यांची माहिती; पेठवडगावात कडकडीत बंद; मृतावर अंत्यसंस्कार

By Admin | Updated: August 25, 2014 00:13 IST2014-08-25T00:11:32+5:302014-08-25T00:13:50+5:30

सीआयडीचे पथकही पेठवडगावमध्ये तपासासाठी दाखल झाले.

Sunny Powar death case: Manoj Kumar Sharma's information; Paddavadwa cracked; Cremation on the dead | सनी पोवार मृत्यू प्रकरण : मनोजकुमार शर्मा यांची माहिती; पेठवडगावात कडकडीत बंद; मृतावर अंत्यसंस्कार

सनी पोवार मृत्यू प्रकरण : मनोजकुमार शर्मा यांची माहिती; पेठवडगावात कडकडीत बंद; मृतावर अंत्यसंस्कार

पेठवडगाव : पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या जगदीश ऊर्फ सनी पोवार याच्यावर आज, रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मिरज येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला असता त्या ठिकाणी नातेवाइकांनी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचवेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व दोन पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले. दरम्यान, सीआयडीचे पथकही पेठवडगावमध्ये तपासासाठी दाखल झाले.
दरम्यान, आज दिवसभर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमवेत आमदार सुजित मिणचेकर व इतर राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी चर्चा करून परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शहरात आजही कडकडीत बंद ठेवला. पोलीस प्रशासनाने शहरात मोठा बंदोबस्त तैनात केल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले होते.
शुक्रवारी महालक्ष्मी देवीच्या यात्रेदरम्यान हाणामारी झाली होती. यातील दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या सिद्धार्थनगरातील तरुणांच्या गटाने बसवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून काल, शनिवारी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे काल संतप्त जमावाने या घटनेस पोलीसच जबाबदार असल्याच्या संशयावरून पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. आक्रमक जमावाने केलेल्या
तुफान दगडफेकीमुळे पोलीस जीव मुठीत घेऊन पळाले होते. तसेच या जमावाने शहरातील प्रमुख चौकातून जोरदार दगडफेक केली. या अनपेक्षित घटनेमुळे नागरिक भयभीत झाले. तत्काळ शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले. अंधाराच्या साम्राज्याने शहराने स्मशानशांतता अनुभवली. अपुरी पोलीस यंत्रणा व शेकडोचा जमाव यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास वेळ लागत होता.
दरम्यान, सनी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाल्याचा /पान २ वर

Web Title: Sunny Powar death case: Manoj Kumar Sharma's information; Paddavadwa cracked; Cremation on the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.