शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
4
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
5
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
6
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
7
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
8
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
9
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
10
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
11
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
12
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
13
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
14
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
15
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
16
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
17
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
18
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
19
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
20
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO

Kolhapur- अमर रहे!, शहीद जवान सुनील गुजर यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:30 IST

वसंत पाटील  पिशवी : अरूणाचल प्रदेश येथे चीन सीमेलगत वाहन अपघातात शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) ...

वसंत पाटील पिशवी : अरूणाचल प्रदेश येथे चीन सीमेलगत वाहन अपघातात शहीद झालेले जवान सुनील विठ्ठल गुजर (वय २५) यांना त्यांच्या मुळ गावी शित्तुर तर्फ मलकापुर येथे शासकीय इतमामात मानवंदना देत हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत साश्रूपुर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थिताच्या अश्रूला बांध फुटला. वडील विठ्ठल गुजर यांनी भडाग्नी दिला. अरूणाचल येथे भूस्खलन झालेल्या ठिकाणी डोझरच्या सहाय्याने मलबा हटवला जात होता. या डोझरवर चालक म्हणून सुनील कर्तव्यावर होते. दरम्यान डोझर घसरून खोल दरीत कोसल्याने सुनील यांना वीरमरण आले होते. हे वृत्त त्यांच्या गावी समजताच संपुर्ण शाहुवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. बांबवडे बाजारपेठे सह परिसरातील गावांत बंद ठेऊन आंदराजली वाहली. जवान गुजर यांच्या अत्यंदर्शनासाठी बांबवडे पासुन त्यांच्या गावापर्यंत दोन्ही बाजुनी नागरिकांनी गर्दी केली होती. कोल्हापूर येथून यांचे पार्थिव निवासस्थानी शित्तुर येथे मुख दर्शनासाठी आणल्यानंतर पत्नी, आई वडील बहिणी भाऊ मित्र परिवार व नातलग यांनी हंबरडा फोडला. त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिस प्रशासन, सैन्य दलाच्या वतीने प्रत्येक तीन फैरी हवेत झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी वीर जवान सुनील गुजर अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य़ कार्यकारी अधिकारी नयन कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, तहशिलदार रामलिंग चव्हाण, माजी आमदार सत्यजीत पाटील, मानसिंगराव गायकवाड, विजय बोरगे, धनंजय पाटील यांनी श्रध्दांजली वाहिली.अपघाताच्या अर्धा तास अगोदर पत्नीचा फोनसुनील व पत्नी स्वप्नाली यांची अवघ्या अडीच वर्षात कायमची ताटातुट झाली. तर अवघ्या सहा महिन्यांच्या मुलगा शिवांशच पितृछत्र हरपल. सुनीलच्या आई वडिलांनी दोन मुली, दोन मुलांचा शेती व वडाप व्यवसाय करत कुटुंबांचा उदरनिर्वाह केला होता. सुनिल त्यांच्या कुटुंबांतील पहिला शासकीय नोकरीमुळे कुटुंब स्थिरस्थावर होत आत्ता कुठे सुखांचे क्षण फुलत होते पण नियतीने त्यांचा आयुष्यांचा आधारच हिरावुन घेतल्याने त्यांच्यावर दुखांचा डोंगर कोसळला. अपघाताच्या अर्धा तास अगोदर पत्नी स्वप्नालीचा शेवटचा फोन झाला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवान