कोल्हापूर : आदमापूर येथील बाळूमामा मंदिरातील भ्रष्ट कारभार व विश्वस्तांच्या वागणुकीविरोधात रविवारी (दि. ९) बाळूमामांचे भक्त व हालसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीने घंटानाद मोर्चा काढण्यात येणार आहे. मुधाळतिट्टा ते बाळूमामा देवालय असा मोर्चाचा मार्ग असेल, अशी माहिती सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मंदिरावर पुन्हा प्रशासक नेमावा, अशी मागणी त्यांनी केली.ते म्हणाले, ट्रस्टमध्ये सुरुवातीपासूनच भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार असून, विश्वस्तांच्या हुकूमशाहीने कारभार चालतो. विश्वस्त स्वत: नियम बनवतात आणि मोडतात. या ट्रस्टमध्ये धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांमुळे वाद चिघळला आहे. यापूर्वी शिवराज नाईकवाडे यांनी प्रशासक म्हणून मंदिराचे कामकाज उत्तम सांभाळले असताना त्यांना बाजूला केले. त्यानंतर रागिणी खडके यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने विश्वस्त निवडले. त्यांच्याकडूनदेखील बकरी, जमीन खरेदी, दानपेट्या, व्हीआयपी दर्शन अशा विविध विषयांवर गैरकारभार सुरू आहे. त्यांना धर्मादाय कार्यालयाकडून पाठीशी घातले जात आहे. हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. त्यासाठी मंदिरावर पुन्हा प्रशासक नेमण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संजय शेंडे, सागर पाटील, महांतेश नाईक यांच्यासह बाळूमामांचे भक्त उपस्थित होते.
Web Summary : Balumama devotees will protest against corruption and mismanagement at the Admapur temple on Sunday. The march, organized by the Sevekari Group, demands the appointment of an administrator due to alleged irregularities in trust operations and trustee conduct. They allege financial misconduct and favoritism from charity officials.
Web Summary : बालूमामा के भक्त रविवार को आदमापुर मंदिर में भ्रष्टाचार और कुप्रबंधन के खिलाफ विरोध प्रदर्शन करेंगे। सेवेकरी ग्रुप द्वारा आयोजित मार्च में ट्रस्ट संचालन और ट्रस्टी आचरण में कथित अनियमितताओं के कारण एक प्रशासक की नियुक्ति की मांग की गई है। उन पर वित्तीय दुराचार और दान अधिकारियों से पक्षपात का आरोप है।