स्वानंद कराओके सिंगीग स्पर्धेची रविवारी प्राथमिक फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:42 IST2021-03-13T04:42:18+5:302021-03-13T04:42:18+5:30
गाण्यांची आवड असणाऱ्या आणि गायनाचा छंद जोपासलेल्या ४० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील सर्व हौशी गायकांसाठी स्पर्धा होणार आहे. त्यातील ...

स्वानंद कराओके सिंगीग स्पर्धेची रविवारी प्राथमिक फेरी
गाण्यांची आवड असणाऱ्या आणि गायनाचा छंद जोपासलेल्या ४० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील सर्व हौशी गायकांसाठी स्पर्धा होणार आहे. त्यातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला दहा हजार रोख, द्वितीय क्रमांकाला सात हजार रोख, तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला पाच हजार रोख आणि स्मृतिचिन्ह बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील सर्व गायक सदस्यांना छोटी कराओके माईक सिस्टीम दिली जाणार आहे. स्पर्धेसाठी दुर्वास कदम, राजेंद्र दिवसे, पद्माकर बहिरशेट, किरण पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत रविवारपर्यंत आहे. प्रवेशिका, प्रवेश शुल्कासह अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी शाहूपुरी चौथी गल्ली (राममंदिर शेजारी) मधील विश्वयोगा योग आध्यात्मिक हॉल येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. राजीव नागांवकर यांनी केले आहे.