करंबळीला 'सुंदर गाव' पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:42 IST2021-02-18T04:42:18+5:302021-02-18T04:42:18+5:30

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-वकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश ...

'Sundar Gaon' award to Karambali | करंबळीला 'सुंदर गाव' पुरस्कार

करंबळीला 'सुंदर गाव' पुरस्कार

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-वकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरपंच प्रवीण माळी, ग्रा. पं. सदस्या उमा सुतार, सविता पोवार, शोभा पाटील, शेवंता माळी, सुनीता कदम, तानाजी कणसे, गौतम कांबळे, एकनाथ गवस, ग्रामसेवक विक्रमसिंह महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, उद्योजक बाळासाहेब शेरेकर उपस्थित होते.

* फोटो ओळी : कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सरपंच प्रवीण माळी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्रामसेवक विक्रमसिंह महाजन, उद्योजक बाळासाहेब शेरेकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रमांक : १७०२२०२१-गड-१०

Web Title: 'Sundar Gaon' award to Karambali