निपाणीच्या नगराध्यक्षपदी सुजाता कोकरे
By Admin | Updated: December 8, 2015 00:39 IST2015-12-08T00:16:47+5:302015-12-08T00:39:59+5:30
निवडणुक बिनविरोध : उपनगराध्यक्षपदी सुनील पाटील

निपाणीच्या नगराध्यक्षपदी सुजाता कोकरे
निपाणी : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षापदी सुजाता कोकरे, तर उपनगराध्यक्षपदी सुनील रामगोंडा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नम्रता कमते व उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी सुजाता संजीव ऊर्फ किरण कोकरे, तर सुनील रामगोंडा पाटील यांचा उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी एस. एस.बिरादार यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले.विश्वासराव शिंदे सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
कोकरे यांचे नाव मावळत्या नगराध्यक्षा नम्रता कमते यांनी, तर मावळते उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई-सरकार यांनी सुनील पाटील यांचे नाव सुचविले.या निवडीनंतर आयुक्त आर. एम. कोडगे, नम्रता कमते, बाळासाहेब देसाई-सरकार, सभापती जुबेर बागवान व नगरसेवकांच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर, राजेंद्र चव्हाण, दीपक माने यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, सभापती जुबेर बागवान, संजय सांगावकर, राज पठाण, प्रवीण भाटले- सडोलकर, रवींद्र चंद्रकुडे, नितीन साळुंखे, अनिस मुल्ला, धनाजी निर्मळे, दत्ता जोत्रे, सर्फराज कोल्हापुरे, मुन्ना काझी, विजय टवळे, दिलीप पठाडे, नगरसेविका पुष्पाताई कुंभार, भारती घोरपडे, सुषमा सडोलकर, उज्ज्वला पोळ, नजहतपरवीन मुजावर, लता शेटके, जायदा बडेघर, नीता लाटकर उपस्थित होत्या.निवडीनंतर नगराध्यक्ष सुजाता कोकरे, उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कित्तूर राणी चन्नम्मा, महात्मा बसवेश्वर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.
आमदार शशिकला जोल्ले, आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी यांच्या मार्गदर्शनातून आपली निवड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू. शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे.
सुजाता कोकरे,
नूतन नगराध्यक्षा
नेत्यांनी विश्वासाने सोपविलेली जबाबदारी पार पाडू. सर्व नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून अधिकाधिक विकासकामे राबवू. सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावे.
सुनील पाटील,
उपनगराध्यक्ष