बंगलोरच्या औषध विक्रेत्याची कोल्हापुरात आत्महत्या
By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:20:14+5:302014-11-29T00:29:18+5:30
चार दिवसांपूर्वी ते रंकाळा परिसरात बहिणीकडे राहण्यास आले होते.

बंगलोरच्या औषध विक्रेत्याची कोल्हापुरात आत्महत्या
कोल्हापूर : बंगलोर येथील औषध विक्रेत्याने कोल्हापुरातील रंकाळा परिसरात राहणाऱ्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. राजेंद्र अर्जुनराव घोरपडे (वय ५४, रा. बंगलोर, मूळ गाव बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र घोरपडे मूळचे बंगलोरचे. ते औषध विक्रीचा व्यवसाय करीत. चार दिवसांपूर्वी ते रंकाळा परिसरात बहिणीकडे राहण्यास आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या मेहुणीने पाहिले. तिने हा प्रकार वीरेंद्र शिवराज पाटील (रा. शाहूपुरी) यांना सांगितला.
त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून जुना राजवाडा पोलिसांना याची वर्दी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घोरपडे यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. (प्रतिनिधी)