दत्तवाड येथे युुुवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST2021-09-05T04:29:37+5:302021-09-05T04:29:37+5:30
येथील युवक युवराज शेखर हुलाण्णावर (वय १६) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी ...

दत्तवाड येथे युुुवकाची आत्महत्या
येथील युवक युवराज शेखर हुलाण्णावर (वय १६) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी पाच वाजता येथील गणपती तालमीत घडली.
युवराज हा गतिमंद होता. मात्र, त्याला व्यायामाची आवड होती. तो व्यायामासाठी तालमीत जात होता. कालच त्याने तालीम पाण्याने धुऊन स्वच्छ केली होती. तालमीत व्यायामासाठी बांधलेल्या दोरीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यायाम करताना दोरी त्याच्या गळ्यात अडकली की काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास संतोष साबळे करीत आहेत.
०४ युवराज हुलाण्णावर