वडगावात दुकानात व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST2021-03-20T04:23:35+5:302021-03-20T04:23:35+5:30

पेठवडगाव : येथील बिरदेव चौकातील एका व्यापाऱ्याने दुकानातच फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. ही नैराश्यातून केल्याचा प्राथमिक अंदाज ...

Suicide of a trader in a shop in Wadgaon | वडगावात दुकानात व्यापाऱ्याची आत्महत्या

वडगावात दुकानात व्यापाऱ्याची आत्महत्या

पेठवडगाव : येथील बिरदेव चौकातील एका व्यापाऱ्याने दुकानातच फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. ही

नैराश्यातून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार शुक्रवारी साडेदहा वाजता उघडकीस आला.

सूर्यकांत महादेव नाझरे (वय ५५, रा. यादव कॉलनी) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत वर्दी नंदकुमार नाझरे यांनी दिली.

अधिक माहिती अशी : बिरदेव चौक येथे कृष्णा बॅग्ज ॲन्ड टाईज् हे दुकान आहे. दुकानांचे मालक नाझरे हे शुक्रवारी अंबाबाई दर्शन घेऊन सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडून साफसफाई केली आणि आतून पुन्हा दुकानाचे बंद करून बसले. रिक्षाचालकाने मालक आत असूनसुद्धा दुकान बंद आहे. याबाबत माहिती

नंदकिशोर नाझरे यांना दिली. दरम्यान, पत्नीही नाष्टा घेऊन आल्यानंतर त्यांनी दुकान उघडून पाहिले असता, पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतदेहांची उत्तरीय तपासणी नवे पारगांव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. नाझरे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे यादव कॉलनीत हळहळ व्यक्त होत आहे.

रक्षाविसर्जन रविवारी आहे. नाझरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. तपास हवालदार बाबासाहेब दुकाने, पतंगराव रेणुसे करत आहेत.

Web Title: Suicide of a trader in a shop in Wadgaon