विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:04+5:302021-01-02T04:22:04+5:30

कोल्हापूर : रिंगरोड परिसरातील एका विवाहित महिलेने शुक्रवारी सकाळी राहत्या घरी पंख्याला कापडी पट्टीने गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती ...

Suicide by strangulation of a married woman | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : रिंगरोड परिसरातील एका विवाहित महिलेने शुक्रवारी सकाळी राहत्या घरी पंख्याला कापडी पट्टीने गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती मिलिंद सरूडकर (वय ३२, रा. ग्रेस रेसिडेन्सी, चंद्राई काॅलनी, रिंगरोड परिसर, फुलेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, ज्योती यांचे पती मिलिंद हे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ते नोकरीला जाण्यासाठी बाहेर पडले. अकरा वाजण्याच्या सुमारास मिलिंद यांना पत्नी ज्योती बेडरूमचा दरवाजा उघडत नाही, असा घरातून फोन आला. त्यांनी ही गोष्ट शेजारी मित्रास सांगितली. त्याने टेरेसवरून उतरून बेडरूमचा दरवाजा उघडला. यावेळी त्यांना ज्योती यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. याची वर्दी मृताचे पती मिलिंद यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: Suicide by strangulation of a married woman