सहआरोपी केल्याने विष पिऊन युवकाची आत्महत्या

By Admin | Updated: January 15, 2017 01:14 IST2017-01-15T01:14:30+5:302017-01-15T01:14:30+5:30

बहिरेवाडीतील घटना : विनयभंग प्रकरण

Suicide by poisoning teenage youth suicides | सहआरोपी केल्याने विष पिऊन युवकाची आत्महत्या

सहआरोपी केल्याने विष पिऊन युवकाची आत्महत्या

कोडोली : विनयभंगप्रकरणी पेठवडगाव पोलिस ठाण्यात सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल झाल्याच्या भीतीपोटी बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील अविनाश आनंदा वाडकर (वय २३, रा. सन्मित्र कॉलनी) या युवकाने राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, अविनाश हा वारणानगर येथे महाविद्यालयात शिकत होता. गुरुवारी मित्राबरोबर तो पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे गेला होता. यावेळी वडगाव येथील अल्पवयीन मुलीने अविनाश याच्या मित्राविरुद्ध विनयभंगाची तक्रार वडगाव पोलिसांत दिली होती. याप्रकरणी अविनाश याला सहआरोपी करण्यात आले होते. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याच्या भीतीने व नैराश्येपोटी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याने राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. अविनाश याला आई, वडील नसून फक्तआजी व एक विवाहित बहीण आहे. (वार्ताहर)

Web Title: Suicide by poisoning teenage youth suicides