प्रेमप्रकरणातून आत्महत्या, दोघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:24 IST2021-05-14T04:24:51+5:302021-05-14T04:24:51+5:30

मलकापूर : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील तेजस ...

Suicide from a love affair, a crime against both | प्रेमप्रकरणातून आत्महत्या, दोघांविरोधात गुन्हा

प्रेमप्रकरणातून आत्महत्या, दोघांविरोधात गुन्हा

मलकापूर : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील तेजस यशवंत शेळके (वय २३) याला आत्महत्या करण्यास भाग पाडले, या कारणावरून महेश महादेव घोडे, राधिका मोहन घोडे (रा. कोकरूड, ता. शिराळा) यांच्यावर शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांतून मिळालेली महिती अशी, फिर्यादी योगेश यशवंत शेळके व महेश घोडे हे एकमेकांचे पाहुणे आहेत. मृत तेजस व राधिका यांचे प्रेमसंबंध होते. २४ एप्रिल रोजी तेजस व राधिका यांनी घरातील ज्येष्ठ मंडळीचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केले होते. याचा राग महेश घोडे यांना होता. दोघांच्या लग्नाला पंधरा दिवस झाले होते. त्यानंतर राधिका हिने आपले संबंध संपल्याचे फोनवरून तेजसला सांगितले होते. संशयित आरोपी महेश घोडे तेजस यास वारंवार फोन वरून धमक्या व शिवीगाळ करत होते. यातून त्रस्त झालेल्या तेजस याने आत्महत्या केल्याचा आरोप करत योगेश शेळके यांने शाहूवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

Web Title: Suicide from a love affair, a crime against both