शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देवरुखच्या कारागिराची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:19 IST

देवरुख (जि. रत्नागिरी) येथील विष प्राशन केलेल्या सराफ कारागिराचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. राहुल शशिकांत नार्वेकर (वय २६) असे त्याचे नाव आहे. बहिणीच्या साखरपुड्यादिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे देवरुखच्या कारागिराची आत्महत्या, कारण अस्पष्ट मृत्यू झाल्याने हळहळ, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद

कोल्हापूर : देवरुख (जि. रत्नागिरी) येथील विष प्राशन केलेल्या सराफ कारागिराचा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. राहुल शशिकांत नार्वेकर (वय २६) असे त्याचे नाव आहे. बहिणीच्या साखरपुड्यादिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी सांगितले, राहुल नार्वेकर हा सोनार कारागीर होता. सुरुवातीला तो मुंबईमध्ये होता. वडिलांचे निधन झाल्याने तो गावी देवरुखला आला. या ठिकाणी तो आई व बहीण यांच्यासोबत राहत होता. देवरुखमध्ये तो सराफी दुकानात कारागिराचे काम करीत होता. ४ डिसेंबरला त्याने राहत्या घरी विष प्राशन केले. त्याच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.

प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. मंगळवारी साखरपुडा असल्याने पै-पाहुणे आले होते. दरम्यान, सकाळी त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी