शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्याच्या पतीकडून गारगोटीत ठेकेदारावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 20:05 IST

गारगोटी : कमिशन न देता रस्त्याचे काम सुरु केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपाराणी जाधव यांचे पती सत्यजित जाधव ...

गारगोटी : कमिशन न देता रस्त्याचे काम सुरु केल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपाराणी जाधव यांचे पती सत्यजित जाधव यांनी चारपाच गुंडांना सोबत घेऊन कंत्राटदाराची स्विफ्ट कार फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली गारगोटीत घडली आहे.याप्रकरणी कंत्राटदार शक्तिसिंह सारंग यांनी भुदरगड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तर रस्त्याचे काम करण्यासाठी सत्यजीत जाधव यांना सात टक्के कमीशन न दिल्याच्या कारणावरून भाडोत्री गुंडानी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदार आशिष पोवार यांनी केला आहे.पोलिसांकडून मिळलेली माहिती अशी की, आशिष पोवार व शक्तीसिंह सारंग यांची रस्त्यांच्या कामात भागीदारी आहे. त्यांनी भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ व सोनुर्ली कामाचे जिल्हा परिषदेचे टेंडर ऑनलाइन पद्धतीने कमी दराने भरले होते. यावेळी सत्यजीत जाधव यांनी सात टक्के कमीशनची मागणी केली होती.आज शुक्रवारी(दि.१७) दुपारच्या सुमारास ते कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सत्यजीत जाधव यांचे स्वीय सहायक (पीए) एकनाथ धनाजी वरंडेकर त्याचा भाचा गणेश पंदारे  व इतर पाच सहाजणांनी हातात काठया व हत्यारे घेऊन शक्तीसिंह याला अडवून या भागात काम करायचे नाही तर तंगडे मोडून ठेवू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तर जीवे मारण्यासाठी त्यांचा पाठलाग केला.यावेळी गारगोटी येथील जोतीबा मंदिर चौकात मोटरसायकलवरुन आलेल्या एका गुंडाने लोखंडी रॉडने त्याच्या गाडीवर जोरदार हल्ला केल्याची फिर्याद आकुर्डे ता.भुदरगड येथील कंत्राटदार शक्तिसिंह सारंग यांनी पोलीसात दिली. दरम्यान सत्यजीत जाधव यांनी कमीशन दिले नसल्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कंत्राटदार आशिष पोवार यांनी केला आहे. या घटनेची भुदरगड पोलीसात नोंद झाली आहे.आरोपात तथ्य नाहीयाबाबत माजी उपसभापती सत्यजित जाधव यांनी ठेकेदाराने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले. तर त्यांनी कमिशन मागितल्याचे सिध्द करावे अन्यथा त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी