कोंडीग्रेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST2021-04-14T04:23:17+5:302021-04-14T04:23:17+5:30

जयसिंगपूर : अभ्यास कर असे सांगितल्याचा राग मनात धरुन दहावीच्या विद्यार्थ्याने कोंडीग्रे (ता. शिरोळ) येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

Suicide of a 10th standard student in Kondigreet | कोंडीग्रेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोंडीग्रेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

जयसिंगपूर : अभ्यास कर असे सांगितल्याचा राग मनात धरुन दहावीच्या विद्यार्थ्याने कोंडीग्रे (ता. शिरोळ) येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रज्वल संजय घाटगे (वय १६, रा. मंगलनगर कोंडीग्रे) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री पावणेनऊच्यासुमारास घडली असून, याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्रज्वल हा दहावी इयत्तेत शिकत होता. दहावीची परीक्षा जवळ आली आहे, तू अभ्यास कर, असे वडिलांनी सांगितले. याचा राग मनात धरुन त्याने घराच्या मागे असलेल्या खोलीतील छतास लोखंडी पाईपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी वडील संजय शंकर घाटगे यांनी पोलिसांत दिली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.

Web Title: Suicide of a 10th standard student in Kondigreet