शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: म्हाकवेत सुगरणीने विणले तब्बल ३ मजली घरटे; वृक्ष, पक्षीप्रेमींतून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:02 IST

दत्तात्रय पाटील म्हाकवे : वाढत्या शहरीकरणामुळे शहरात मजल्यावर मजले असणाऱ्या टोलेजंग इमारती पाहायला मिळतात. आता ग्रामीण भागातही मजल्यावर मजले ...

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : वाढत्या शहरीकरणामुळे शहरात मजल्यावर मजले असणाऱ्या टोलेजंग इमारती पाहायला मिळतात. आता ग्रामीण भागातही मजल्यावर मजले होत आहेत. ‘जसा वेश तसा देश’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. त्याप्रमाणे आजूबाजूच्या राहणीमानाचा परिणाम पशुपक्ष्यांवर होत असल्याचे त्यांच्या कृतीतून जाणवू लागले आहे. याची प्रचिती म्हाकवे (ता. कागल) येथील एका विहिरीवरील झाडाला सुगरणीने तब्बल तीन मजली घरटे बांधून दिली आहे.गावच्या पश्चिमेला गावानजीकच एकनाथ शंकर माळी यांच्या विहिरीवर असणाऱ्या चिक्कूच्या झाडाला सुगरणींकडून घरटी बांधण्याचे काम सुरू आहे. एक महिन्यापासून सुरू असणाऱ्या घरट्यांकडे माळी कुटुंबियांनी फारसे औत्सुक्याने पाहिलेले नव्हते. मात्र, एका घरट्यालाच दुसरे आणि काही दिवसांनंतर तिसरे घरटे लोंबकळताना दिसल्याने ते अवाक् झाले.

वृक्ष संवर्धनाचे संकेत तर नाहीत ना?झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे रहिवासासाठी जागेची टंचाई भासत आहे. त्यामुळे इमारत बांधकामात अपार्टमेंटचा पर्याय पुढे आला. त्याप्रमाणे सध्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळेच आम्हीही अपार्टमेंटचा पर्याय शोधला असल्याचे पक्षी आपल्या कृतीतून सांगत तर नसतील ना? अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

..म्हणून काही घरटी अर्धवटघरट्याच्या बांधकामाची सुरुवात ही नर पक्षी करतो. निम्मे घरटे बांधून झाले की, सुगरण येऊन पाहणी करते. आपल्यासह मुलांना योग्य असेल तरच ते घरटे दोघे मिळून पूर्ण करतात. अन्यथा ते अर्धवट सोडून नर पक्ष्याला दुसरे घरटे बांधावे लागत असल्याचेही पक्षी अभ्यासक सांगतात.

महिन्यापूर्वी झाडावर नियमितपणे पक्षी घरटी बांधण्याच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे आम्ही याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र, गेल्या आठवड्यात अत्यंत कलाकुसरीने सजवलेली एकाच घरट्याला जोडून तीन घरटी दिसल्याने पक्ष्यांचे कौतुक वाटले. - एकनाथ माळी, शेतकरी, म्हाकवे 

जगभरात सुगरण पक्ष्यांच्या हजारो जाती आहेत. यामध्ये आपल्या भागात आढळणारी सुगरण ही घरटे बांधण्यातील तरबेज मानली जाते. कोणत्याही शाळेशिवाय निसर्गाकडून त्यांना मिळालेले हे वरदानच म्हणावे लागेल. - प्रणव देसाई ,पक्षी अभ्यासक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर