शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

शंभर रुपयांसाठी साखर अडवणार, राजू शेट्टी यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 16:46 IST

'जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत गाड्या बाहेर सोडणार नाही'

शिरोळ : साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून गतवर्षीचा १०० रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला नाही. तातडीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. ते पैसे आमच्या हक्काचे आहेत. मागील थकीत पैसे घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यासाठी लोकसभा निवडणुका झाल्यावर साखर अडवणार आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत गाड्या बाहेर सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी बुधवारी रात्री दिला. अब्दुललाट (ता. शिरोळ) येेथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.ते म्हणाले, शेतकऱ्यांना गुलाम करण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. माझी लढाई त्या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आहे. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला पण धनदांडग्यांनी सामान्य माणसाला पारतंत्र्यात ठेवले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदार माझ्या विरोधात एकवटले आहेत. गेल्या ५ वर्षांत मी स्वस्थ बसलो नाही. सर्वसामान्यांची हक्काची लढाई लढत आलो आहे. गेली ३० वर्षे शेतकरी चळवळ चालवत आलो आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे. महापुराच्या काळात पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरकारने थट्टा केली. ५० हजार शेतकरी जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. तरीही महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची दया आली नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी त्यावेळी वाऱ्यावर सोडले. महायुती व आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे.प्रा. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, शैलेश आडके, विठ्ठल मोरे यांची भाषणे झाली. यावेळी सहदेव चौधरी, सचिन शिंदे, आप्पा पाटील, पोपट अक्कोळे, महावीर गिरमल, जयश्री पाटील, मिलिंद साखरपे, राम शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी