शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उसाला एकरकमी प्रतिटन ३००१ रूपये दर देणार?, कोल्हापुरातील चार साखर कारखान्याच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 13:01 IST

राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेतून मागील हंगामातील चारशे रुपये मिळावेत यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे

शिरोळ : चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार प्रतिटन विनाकपात एकरकमी ३००१ रुपये देण्याचा निर्णय शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील चार साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतला आहे.याबाबत बुधवारी बैठक झाल्याचे समजते. श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, शरद कारखाना नरंदे, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर हुपरी आणि श्री दत्त शिरोळ या चार साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.ऊस दराच्या प्रश्नावरून विविध संघटनांच्यावतीने वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरू आहेत. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रेतून मागील हंगामातील चारशे रुपये मिळावेत यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. येत्या सात नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. दरम्यान, एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी असल्याने हंगाम सुरू होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर चार कारखानदारांची ही बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत ३००१ रुपये प्रतिटन एकरकमी दर देण्याचा निर्णय झाल्याचे समजते. याबाबत रात्री उशिरापर्यंत दुजोरा मिळाला नाही. दरम्यान, ऊसतोड मजुरांच्या टोळ्यादेखील दाखल होत आहेत त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने