शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

ऊसाचा हंगाम अन् अपघातांना निमंत्रण नित्याचेच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:05 IST

accident, Sugar factory, kolhapur ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसात तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देऊसाचा हंगाम अन् अपघातांना निमंत्रण नित्याचेच..! गडहिंग्लज तालुक्यातील चित्र : १५ दिवसात तिघांचा मृत्यू

शिवानंद पाटील 

गडहिंग्लज- ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासियांना येत असून गेल्या पंधरा दिवसात तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे.अडकूर (ता. चंदगड) येथील कादर आदम कोवाडकर (वय ४५, रा. अडकूर, ता. चंदगड) हे दुचाकीने गडहिंग्लजहून घरी परतत होते. हरळीनजीक ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॉलीचा अ‍ॅक्सेल तुटल्याने डब्यातील संपूर्ण ऊसच त्यांच्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.मंगळवारी (१) नूल (ता. गडहिंग्लज) येथे भल्या पहाटे जनावरांना सायकलीवरून वाडे आणण्यासाठी जाणाऱ्या शाहरूख सनदी (वय २४) या तरूणाचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत प्राण गमवावा लागला.बुधवारी (२) गडहिंग्लज-उत्तूर मार्गावर उत्तूरचे कापड व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या दुचाकीने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली सुस्थितीत नसणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणे, वाहनांमध्ये मोठ्याने टेप लावणे, वाहनांच्या पाठीमागील बाजूस रिपलेक्टर न लावणे, रिकामे ट्रॅक्टर व ट्रक वेगाने पळविणे आदी कारणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वाहतूक प्रशासनानेही वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.वाहतुकीची कोंडीआजरा, चंदगड, संकेश्वर, गारगोटी, निपाणीकडे जाण्यासाठी शहरातील गडहिंग्लज-संकेश्वर-आजरा या एकाच मुख्य रस्त्यावरून वाहतूक होते. याच मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालये, वाचनालय, बाजारपेठ, नगरपालिका, पोलिस ठाणे असल्याने याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच ऊसाची वाहतूकही या मार्गावरून होत असल्याने या मार्गावर जीव मुठीत घेवूनच वाहने चालवावी लागतात. 

 रिंगरोड हाच उपायशहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी पर्यायी मार्गाची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील प्रलंबित रिंगरोडचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने