करवीर तालुक्यातील ऊस,भात भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST2021-07-27T04:26:59+5:302021-07-27T04:26:59+5:30
करवीर तालुक्यातील कुंभी, भोगावती, तुळसी, पंचगंगा या नद्यांना मुसळधार पावसाने महापूर आल्याने नदी बुडीत क्षेत्रातील १५ हजार हेक्टरवरील ऊस ...

करवीर तालुक्यातील ऊस,भात भुईसपाट
करवीर तालुक्यातील कुंभी, भोगावती, तुळसी, पंचगंगा या नद्यांना मुसळधार पावसाने महापूर आल्याने नदी बुडीत क्षेत्रातील १५ हजार हेक्टरवरील ऊस व ७ हजार हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान होणार आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने माळरानावरील ५ हजार हेक्टर ऊस पिके जमीनदोस्त झाली आहेत. २०१९ मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुरापेक्षा यावर्षी पाण्याची पातळी वाढल्याने तालुक्यातील ८० गावात नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नऊ हजार कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. आज महे-बीड, हळदी-राधानगरी वगळता सर्व मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे.
...........
८० गावांना महापुराचा फटका
करवीर तालुक्यातील १०२ गावे पाण्याचा फटका बसणारी आहेत. यातील २३ गावे अतिसंवेदनशील ओळखली जातात; पण यावर्षी ८० गावांना महापुराचा फटका बसला आहे.
२६ करवीर
करवीर तालुक्यात महापुराचे पाणी भात शेतीत शिरल्याने नुकसान झाले आहे.