शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एफआरपीत प्रतिटन १५० रुपयांची वाढ, कृषी मूल्य आयोगाची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:08 IST

एका बाजूला रासायनिक खतांच्या दरात वर्षभरात दुपटीने वाढ झाल्याने उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे ही वाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपुरीच आहे

कोल्हापूर : आगामी गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपीत प्रतिटन १५० रुपये वाढ करून ती ३,०५० रुपये करण्याची आणि १०.२५ टक्के बेस रेट धरून पुढील प्रत्येक टक्का उताऱ्याला प्रतिटन ३०५ रुपये वाढ देण्याची शिफारस केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केली आहे. ही शिफारस केंद्रीय अन्न मंत्रालयाने गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविली असल्याचे समजते. ही शिफारस मंजूर झाली, तर कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी १२.५० टक्के उतारा गृहित धरला, तर ३,७३६ रुपये एफआरपी होते. त्यातून सरासरी ७२५ रुपये तोडणी-ओढणी वजा जाता निव्वळ एफआरपी ३,०११ रुपये ऊस उत्पादकांच्या पदरात पडणार आहे.गेल्यावर्षी १० टक्के उताऱ्याला २,९०० रुपये एफआरपी निश्चित केली होती. त्यात २०२०च्या तुलनेत केवळ ५० रुपये वाढ झाली होती; तर पुढील प्रत्येक टक्क्यातही केेवळ ५ रुपयांची वाढ करून ती २८५ वरून २९० केली होती. यावर्षी गतवर्षीपेक्षा १५० रुपयांची वाढ दिसत असली, तरी उताऱ्याचा बेस रेट ०.२५ टक्के वाढविल्याने प्रत्यक्षातील वाढ १०० रुपयेच होते. एका बाजूला रासायनिक खतांच्या दरात वर्षभरात दुपटीने वाढ झाल्याने उसाचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे ही वाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपुरीच आहे.

कोल्हापूर जिल्ह्याची एफआरपी ३०११ रुपये

कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी १२.५० टक्के साखर उतारा गृहित धरता, गेल्यावर्षी एफआरपी ३,६३१ रुपये होती, त्यातून ६७९ रुपये तोडणीचा खर्च वजा जाता, २,९०० रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते. यावर्षी १२.५० टक्के उताऱ्याला ३,७३६ रुपये एकूण एफआरपी असणार आहे, पण त्यातून तोडणी-वाहतूक खर्च सरासरी ७२५ रुपये वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात ३,०११ रुपये पडणार आहेत.

कृषी मुल्य आयोगाने वाढीव एफआरपी देण्याची शिफारस केली हे चांगलेच झाले कारण शेतकऱ्यांचा खर्चही वाढला होता. साखर उद्योग साखरेचा खरेदी दरही ३१ वरून किमान ३६ रुपये करावा यासाठी गेली चार वर्षे मागणी करत आहे. परंतू त्याकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. साखरेला किंमत मिळाल्याशिवाय ऊसाची बिले देण्यासाठी कारखानदारी पैसे कोठून आणणार याचाही विचार व्हायला हवा.  - पी.जी.मेढे, साखर उद्योग तज्ञ

उतारानिहाय एफआरपी

उतारा     एकूण एफआरपी      तोडणी खर्च     निव्वळ एफआरपी
१०.२५ ३०५०७२५२३२५
११.५०३४३१७२५ २७०६
१२.००३५८४७२५२८५९
१२.५०३७३६७२५३०११
१३.००३८८९७२५३१६४
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने