शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

साखर कारखाने आजपासून बंद ऊसदराचा प्रश्न : शासनाकडे मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:00 IST

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे ...

ठळक मुद्देयंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाहीवाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.

कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बॅँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगाम चालविणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करून आज, बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या कोल्हापुरात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.शासनाच्या मदतीशिवाय हंगाम सुरू करणे अशक्य असल्याचे मतही अनेक कारखानदारांनी व्यक्त केले. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाईटपणा कारखानदारांनी घ्यायला नको म्हणून तोडगा निघेपर्यंत धुराडी बंद करण्याचे ठरले.

‘रयत क्रांती’ शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक २०० रुपये, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने विनाकपात ३२१७ रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी ३५०० रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, ‘राजाराम’सह इतर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमाभागातील ऊस तिकडे जात आहे. त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सध्या साखरेचा दर २९ रुपये आहे. बॅँकांकडून ८५ टक्क्यांप्रमाणे मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊसतोडणी-वाहतूक खर्च, मागील हंगामातील कर्जाचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवणेच योग्य होईल, असे कारखानदारांनी सुचविले. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगाम सुरू होणे अशक्य आहे, असा बैठकीत निर्णय घेतला. बैठकीला ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘हमीदवाडा’ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक, ‘राजाराम’चे अध्यक्ष हरीश चौगले, ‘गुरुदत्त’चे अध्यक्ष माधवराव घाटगे, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष विलास गाताडे, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, साखर तज्ञ पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते.हे देखील महत्त्वाचे कारणदिवाळीचा सण तोंडावर असल्याने ऊस तोडणी टोळ््या अजून मराठवाड्यातून आलेल्या नाहीत. त्यामुळे संघटनेचा रोष ओढवून घेण्यापेक्षा हंगामच बंद ठेवून दबाव वाढवण्याचाही हेतू कारखाने बंद करण्यामागे आहे. यंदा सरकार या प्रश्नांत सहकार्याची भूमिका घेईल असे दिसत नाही. कारण गेल्या हंगामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली, परंतु वाढीव २०० रुपये न मिळाल्याने ते रोषाचे बळी ठरले आहेत.सातारा, सांगलीतही कारखाने बंदकोल्हापुरातील कारखानदारांच्या बैठकीतील निर्णयाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगली व सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांशी फोनवरून चर्चा केली. त्यांनीही शासन मदत देत नाही तोपर्यंत हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर