शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी-वाहतूक खर्चातील मनमानीला चाप

By admin | Updated: April 3, 2017 00:48 IST

शासनाचे नियंत्रण राहणार : स्लीप बॉय, मदतनीसांचा पगारच खर्चात धरता येणार

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --ऊसतोडणी मजुरांना दिलेल्या पैशांच्या व्याजासह मनाला येईल तो खर्च ऊसतोडणी, वाहतूक खर्चात समाविष्ट केला जात होता, त्याला आता चाप बसणार आहे. ऊसनियंत्रण समितीच्या निर्धारित नियमावलीनुसारच साखर कारखान्यांना तोडणी व वाहतूक खर्च निश्चित करावा लागणार आहे. त्यामध्ये शेती विभागातील स्लीप बॉय व मदतनीस यांच्या वेतनाचा समावेश करता येणार आहे. एकूण खर्च हा जिल्ह्यातील इतर बाबींसाठी निश्चित केलेल्या दरसूचीपेक्षा जास्त असणार नाही, याची दक्षता कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. उसाची एफआरपी ठरविताना शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या गेटवर ऊसपुरवठा करावा, असे संकेत आहेत. पण राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा सर्रास कारखान्यांच्या माध्यमातून राबविली जाते. त्यामुळे ‘एफआरपी’ निश्चित करताना ऊसतोडणी, वाहतूक खर्च वजा केला जातो. एफआरपी कमी करण्यासाठी काही साखर कारखाने मखलाशी करून तोडणी व वाहतूक खर्च फुगवतात, अशी तक्रार गेली अनेक वर्षे सुरू आहे. शेतकरी संघटना प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीस कारखान्यांच्या या धोरणावर टीका करून यामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी करत होते. सरकारने २ डिसेंबर २०१५ मध्ये साखर संचालक (प्रशासन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. तोडणी व वाहतूक खर्चाची कमाल मर्यादा निश्चित केल्यानंतर हा प्रस्ताव ऊस नियंत्रण मंडळासमोर ठेवला. मंडळाच्या सदस्यांच्या सूचनेनुसार त्यात फेरबदल करून अंतिम नियमावली तयार केली. ऊसतोडणी मजुरांना दिलेल्या अ‍ॅडव्हान्सवरील व्याज या खर्चात टाकता येणार नाही. ऊस वाहतूक अनुषंगिक खर्च यामध्ये धरता येईल, पण त्यालाही मर्यादा राहणार आहेत. सरकारचे नियंत्रण राहणार असल्याने यामध्ये सुसूत्रता येणार आहे. सध्या जिल्ह्यात प्रतिटन पावणे सातशे रुपयांपर्यंत तोडणी-वाहतूक खर्च टाकला जातो. त्यामुळे या खर्चात शंभर ते दीडशे रुपये कमी होऊ शकतात. काय आहेत नियमावलीअंतर निहाय वाहतुकीचे ० ते २५ किलोमीटरचे टप्पे करावेत.जिल्ह्यातील विविध बाबींसाठी निश्चित केलेल्या दरसूचीपेक्षा ऊस वाहतुकीचे दर जास्त असू नयेत. साखर संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडून हा खर्च मागवून घेऊन त्यातील कमीत कमी खर्च निश्चित करावा. मजुरांना वाटप केलेल्या रकमेवरील व्याज या खर्चात धरू नये.मजुरांचा ने-आण खर्च यामध्ये धरावा.मजुरांच्या निवासासह इतर अनुषंगिक खर्च धरावा.बैलगाडी दुरुस्ती व देखभाल खर्च समाविष्ट करावा पण ट्रॅक्टर व ट्रकचा करता येणार नाही. हंगामी स्लीप बॉय, शेती मदतनीसांचे वेतन खर्चात धरावे. शेती विभागाच्या कामकाजाला लागणारी स्टेशनरी, दळणवळण यंत्रणा, कार्यालय भाडे, दुरूस्ती, आदी खर्च धरता येणार नाही.