‘उदय साखर’ची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:07 IST2021-02-20T05:07:52+5:302021-02-20T05:07:52+5:30
सन २०२०-२१ मध्ये गाळपास आलेल्या ११२ दिवसांत सरासरी १२.२४ उताराने ३,६०९८० टन उसाचे गाळप केले असून ४,३६,२८० ...

‘उदय साखर’ची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
सन २०२०-२१ मध्ये गाळपास आलेल्या ११२ दिवसांत सरासरी १२.२४ उताराने ३,६०९८० टन उसाचे गाळप केले असून ४,३६,२८० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
७ फेब्रुवारीपर्यंतचे सर्व ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. तसेच ऊसतोडणी वाहतूक व कंत्राटदार यांचेही बिल अदा केले आहे. उर्वरित कालावधीमध्ये चांगले सहकार्य करून पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही योगेश पाटील यांनी केले आहे. यावेळी युनिट हेड रवींद्र देशमुख, शेती अधिकारी आनंदराव पाटील, चीफ इंजिनिअर सर्जेराव पाटील, चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, चीफ अकौंटंट सुजय पाटील, दशरथ पवार, जयसिंग पवार आदी यावेळी उपस्थित होते.
फोटो १८ योगेश पाटील